मतदान केंद्र परिसरात जमावबंदी आदेश लागू
ठाणे-जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदान केंद्र असलेल्या इमारतीच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 26 मे रोजी रात्री 12 पासून ते 28 मे मतदानमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत लागू राहील.निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी हा जमावबंदी आदेश ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत निवडणूक क्षेत्रातील निवडणुकीच्या परिसरात लागू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.