मजुराच्या मृत्यू प्रकरणी सेफ्टी मनेजर विरोधात गुन्हा दाखल

कल्याण-  डोंबिवली एम आय डी सी परसारातील एका कंपनीत महिनाभरा पूर्वी एका मजुराचा लिफ्ट मधून पडून मृत्यू झाला होता या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली होती.अखेर दोन महिन्याच्या तपासाअंती पोलिसांनी कंपनीचा सेफ्टी मनेजर रुदय वालावलक विरोधात कामगारांच्या सुरक्षितेविषयी निष्काळजीपणा करत मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला आहे .
    डोंबिवली सोनार पाडा एम आय डी सी परिसरात असलेल्या सीएफसी मेट्रो पोलीटीन एक्झिम केम या कंपनीत १ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास काम करत असताना एका मजुराचा लिफ्ट मधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती .या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात नोंद करत पोलीसानि तपास सुरु केला होता अखेर काल सायंकाळी या प्रकरणी पोलिसांनी सदर लिफ्ट च्या मागील भिंतीकडील भिंत व लिफ्ट मध्ये एक फुटाचे अंतर होते तसेच लिफ्टच्या मागील बाजूस मोकळ्या भागास कंपनी चे सेफ्टी मनेजर या नात्याने कामाच्या सुरक्षित तेच्या दृष्टीने स्टील गार्ड किंवा लोखंडी पत्रा लावत बंद न केल्याने सदर मजुराचा पडून मृत्यू झाल्याचा ठपका सेफ्टी मनेजर रुद्य वालावलक वर ठेवत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email