मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले अनेक महत्वाचे निर्णय
मुंबई – मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले आहेत.
- अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण मंजूर. – पाच वर्षात 200 कोटी डॉलर गुंतवणुकीसह एक लाख रोजगार निर्माण होणार.
- महाराष्ट्र वस्त्रोद्योग धोरण 2018 मंजूर – वीजदर तसेच मागास भागात विविध सवलती.
- महाराष्ट्र काथ्या उद्योग 2018 मंजूर. – महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळामार्फत अंमलबजावणी.
- महाराष्ट्र लॉजिस्टिक पार्क धोरण 2018 मंजूर – आर्थिक विकासासाठी लॉजिस्टिक पार्कस् चा विकास करणार.
- महाराष्ट्र इलेक्ट्रिक व्हेईकल प्रोत्साहन धोरण 2018 मंजूर. – इलेक्ट्रीक व्हेईकलचा दळणवळणासाठी वाढता वापर करण्यास प्रोत्साहन.
- महाराष्ट्र फिनटेक धोरण 2018 मंजूर. – फिनटेक पॉलिसीच्या माध्यमातून 3 वर्षांत 300 स्टार्ट अपच्या निर्मितीचे लक्ष्य.
- रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स अँड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व इतर अभियांत्रिकी घटकांसाठी फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण मंजूर.
- महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण 2013 ला मुदतवाढ.
- राज्य वस्तू व सेवा करावर आधारित औद्योगिक प्रोत्साहन अनुदानिय सुत्रात सुधारणा.
- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करुन ग्रामपंचायतीच्या राखीव जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ.
- आर्मी लॉ कॉलेज स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमानुसार देय असलेल्या मुद्रांक शुल्कास माफी.
- राज्यात स्वीस चॅलेंज पद्धतीने कामे हाती घेण्याच्या धोरणासाठी महाराष्ट्र पायाभूत सुविधा सक्षम प्राधिकरण अधिनियम 2018 चा अध्यादेश काढण्यास मंजुरी
असे अनेक महत्वाचे निर्णय मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आले आहेत. जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) यांच्या कडून काढण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकाद्वारे सदर माहिती देण्यात आली आहे.
Please follow and like us: