मंत्रालय मुंबई बाहेर हलविणार ?

पंढरपूर – मुंबई शहरातील वाढती गर्दी व भविष्यातील ताण लक्षात घेऊन मुंबईचा भार हलका करण्यासाठी मंत्रालयसह काही प्रमुख कार्यालये मुंबई बाहेर हलविण्याचा विचार असल्याचे सूतोवाच नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले आहे. पंढरपूरमधील विकास कामांच्या भूमिपूजन समारंभासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.

मुंबई शहर आणि उपनगरे झपाट्याने वाढत आहेत. वाहनांची गर्दी वाढते आहे. सर्वांची रीघ एकाच दिशेने असल्याने दक्षिण मुंबईवर त्याचा मोठा ताण येतोय. भविष्यात हा ताण अधिक वाढण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन प्रमुख कार्यालये मुंबई बाहेर काढण्याचा शासनाचा मानस असल्याच पाटील यांनी स्पष्ट केले. त्याचा पहिला टप्पा म्हणून नवी मुंबईच्या धर्तीवर मुंबई शहराच्या बाहेर नैना हे अद्यावत शहर वसविण्याचे काम सुरू असल्याचही त्यांनी सांगितलं.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email