मंगळसूत्र चोरणारा चोर गजाआड
(श्रीराम कांदु)
डोंबिवली : घरकाम करणाऱ्या एका महिलेचे बनावट मंगळसूत्र लंपास करणा-या चोरटयाला नागरिकांनि पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले तर या झटपाटीत या चोरट्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला .राजेश जयस्वार असे या अटक चोरट्याचे नाव आहे .
डोंबिवली पुर्वेकडील आजडेपाडा परिसरात राहणारी महिला काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास मिलाप नगर येथिल ग्रीन स्कुल च्या रस्त्याने जात असताना राजेश जयस्वार व त्याचा साथीदार एक मोटरसायकल वरून आले .राजेश ने खाली उतरून या महिलेच्या गळ्यातील बनावट मंगळसूत्र हिसकावून पळ काढला मात्र या महिलेने आरडा ओरड केल्याने आस पासच्या नागरिकांनी धाव घेत या चोरत्याला पकडले मात्र त्याचा साथीदार तेथून निसटण्यात यशस्वी झाला .राजेश जयस्वारला मानपाडा पोलिसानी अटक केली असून त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू केला आहे .
Please follow and like us: