भ्रष्ट मनपा अधिकारी,भूमाफिया यांच्या पासून मला धोका ; नगरसेवक रमाकांत पाटिल
कल्याण डोंबिवली महानगरपालिचे वार्ड क्रमांक 109 चे नगरसेवक रमाकांत पाटिल यांनी मानपाड़ा पोलिस स्टेशनला एक पत्र दिले. आपल्या वार्डमधील अनधिकृत बांधकामाविरोधात आवाज उठावाल्याने कल्याण डोंबीवली महानगरपालिकेचे भ्रष्ट अधिकारी तसेच सक्रिय भूमाफिया व नियम तोडणारी बिल्डर लॉबी यांच्याकडून त्यांच्या जीवाला धोका असल्याची तसेच एखाद्या खोट्या प्रकरणात त्यांना अडकवण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
नगरसेवक रमाकांत पाटिल यांनी हे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नगर विकास राज्यमंत्री रणजीत पाटील कल्याण डोंबीवली महानगर पालिका आयुक्त पी वेलारासु, ठाणे पोलिस आयुक्त,पोलिस उपायुक्त परिमंडल 3 व सहायक पोलिस आयुक्त डोंबीवली यांनाही पाठवले आहे. रमाकांत पाटिल यांनी दिलेल्या या पत्रानुसार महानगरपालिका निवडणुक 2015 नंतर आपल्या प्रभागातिल अनधिकृत बांधकामाविरोधात त्यांनी अनेक तक्रारी दिल्या आहेत.परंतु पालिका अधिका-यांनी त्यावर कारवाई केलेली नाही.पाटील यांच्या मते कमाईच्या आड येणा-याला धडा शिकवायचा प्रयत्न बिल्डर व भूमाफिया करू शकतात.बिल्डर , भूमाफिया व भष्ट्र पालिका अधिकारी संगनमत करुन आपल्या जीवितास धोका पोचवू शकतात किंवा आपल्याला एखाद्या खोट्या प्रकरणात अडकवू शकतात असे पाटील यांचे मत आहे.