भूल घालून एका इसमाचे पैसे लुबाडले

उल्हासनगर-भूल घालून एका इसमाचे पैसे लुबाडल्याचा प्रकार नुकताच उल्हासनगर येथे घडला.याप्रकरणी विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की विजयकुमार सुग्रिव सिंग (४७) हे शनिवारी दुपारी अडीच वाजता दरम्यान उल्हासनगर क्रमांक ४ या विभागातुन जात असताना एक रिक्षा त्यांच्या जवळ येवून थांबली.रिक्शा चालकाने उतरून रिक्षात मागे बसलेली व्यक्ती त्याला बोलवत असल्याचे सांगितले.ते तेथे गेले असता मागील व्यक्तीने त्यांना रिक्षेत बसण्यास सांगितले.यानंतर त्याला आपल्या डोळ्यात पहायला सांगुन त्याला भूल घालून त्याच्या खिशातील १४ हजार ५०० रुपये काढून घेतले. विजयकुमार सुग्रिव सिंग यांनी याप्रकरणी  विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार कुरकुरे पुढील तापस पहात आहेत.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email