भूलथापा देत वृद्ध महिलेला लुबाडले

कल्याण दि.१९ – कल्याण पश्चिम येथील सहकार नगर येथील सिद्धी विनायक चाळीत राहणारी ७८ वर्षीय महिला गत सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सूमारास मोहने येथील बँकेसमोरून पायी चालत जात असताना त्यांना दोन अज्ञात इसमांनी हटकले. त्यामधील एक इसमाने शेठ ला बऱ्याच दिवसांनी मुलगा झाल्याने शेठ साड्या व मिठाई वाटतोय तुम्ही तुमचे दागिने पाकिटात काढून ठेवा असे सांगितले.

हेही वाचा :- लैंगिक शोषणाची खोटी तक्रार

या आमिशला बळी पडत या महिलेने आपल्याजवळील सुमारे १० हजार किमतीचे दागिने पाकिटात काढून ठेवत ते पाकीट पिशवीत ठेवले. ही संधी साधत या अज्ञात इसमाने हातचलाखीने त्यांच्या पिशवीत दागिन्यांचे पाकीट काढून तेथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणी या महिलेने खडकपाडा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असुन या तक्रारी नुसार पोलिसांनी दोन अज्ञात भामट्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांचा शोध सुरू केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email