भूलथापा देत भामट्याने विद्यार्थ्याची सोन्याची चैन लांबवली

कल्याण – भूलथापा देत पादचारी नागरिकांना विशेषतः महिला वर्गला लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत त्यातच कल्याण पूर्वेत एका १७ वर्षीय विद्यार्थ्याला भूलथापा देत त्याच्या गळ्यातील ३० हजारांची सोन्याची चैन लांबवल्याची घटना घडली आहे .
 कल्याण पूर्वेकडील मंगलराघो नगर येथील चाळीत राहणारा प्रतिष तेरवनकर हा १७ वर्षीय विद्यार्थी काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रासह ट्युशन ला जात असताना म्हसोबा चौकात पोहचले असताना अज्ञात इसमाने त्यांना हटकले .या ठिकाणी एका मुलीचा अपघात झाला आहे ज्यांनी अपघात केला ती पाच मुले तुमच्यासारखी क्लासला जाणारी होती त्यामधील दोघांना आम्ही पकडले तुम्ही त्यांना ओळखाल आमच्या सोबत चला अशी भूलथाप देत या प्रतिषसह त्याच्या मित्राला लोकग्राम येथे घेवून गेले तेघून प्रतिषला भाईला तुला भेटायचे आहे असे सांगत चक्की नाका परिसारत नेवून त्याला बोलण्यात गुंतवून प्रतिषच्या गळ्यातील ३० हजार रुपये सोन्याची चैन काढून तेथून पळ काढला .या प्रकरणी प्रतिषने कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तापस सुरु केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.