भूलथापा देऊन गाडीतील 50 हजारांची रोकड लंपास केली
(श्रीराम कांदु)
कल्याण : तुमचे पैसे खाली पडले आहेत अशी भुलथाप देत एक चारचाकी गाडीत ठेवलेली 50 हजार रुपये रोकड दुकलीने लंपास केल्याची घटना कल्याणात घडली आहे .या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात दुकली विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
कल्याण पश्चिमेकडील एव्हरेस्ट नगर बेतूकरपाडा परिसरात राहनरे विजय पवार काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास सिंडिकेट येथे आपल्या चार चाकी गाडीत बसले होते यावेळीं अचानक एका इसमाने त्यांना गाडीखाली पैसे पडले आहेत असे संगीतले त्यामुळे पवार गाडी खाली उतरून पाहत असताना या इसमाचा सोबत असणाऱ्या इसमाने त्यांच्या गाडीचा दरवाजा उघडत गाडीत ठेवलेली 50 हजारांची रोकड उचलली व क्षणार्धात या दोघांनी मोटर सायकल वर बसून धूम ठोकली .या प्रकरणी पवार यांनी महात्मा फुले पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात दुकलीविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .काही दिवसांपूर्वी पत्रकार संदेश शिर्के यांच्या गाडीतून अशाच प्रकारे भामट्याने 1 लाख रोकड व कॅमेरा असलेली बॅग लंपास केली होती या प्रकरणी महात्मा फुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखक करण्यात आला होता .या प्रकरणी तपास सुरू असताना पुन्हा अशाच प्रकारे लुटीच्या घटना सुरू असल्याने नागरिक धास्तावले आहे .
Please follow and like us: