भूतानची ओळख जगातील  एकमेव टोबॅको फ्री देश

भूतानची ओळख जगातील  एकमेव टोबॅको फ्री देश

–     योगेश  आलेकरी  

 

डोंबिवली :- दि. १९ 

   भारतीय लोक तंबाखू खाण्यास शिकलेपरंतु कुठे थुंकावे हे शिकले नाहीततसेच सिगारेट ओढण्यात पटाईत आहेत परंतु त्याचे थोटूक कुठे टाकावे हे त्यांना कळत नाही.  म्हणूनच भूतानची ओळख जगाला  “एकमेव टोबॅको फ्री” देश अशीच आहे  भूतान मध्ये आजच्या तारखेला तंबाखूस पूर्णतः मज्जाव आहे असे  योगेश  आलेकरी  यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात सांगितले.

 

  ` विविसु डेहरा या  संस्थेने  योगेश आलेकरी  यांच्या भूतान देशातील अनुभवांवर आधारित मुलाखतीचा  कार्यक्रम  टिळकनगर विद्यामंदिर येथे आयोजित केला होता. या कार्यक्रमात उदय  गोखले  यांनी   आलेकरी  यांनी नेमके प्रश्न विचारून बोलते केले.  कुणाल सुतावणे यांनी स्वागत केले तर  विलास सुतावणे यांनी मागील कार्यक्रमांचा  आढावा घेतला. कार्यक्रमास पर्यावरण  तसेच पर्यटनप्रेमी नागरिकांनी खूपच  गर्दी केली होती. योगेश यांनी भुतांची सफर मोटरसायकलने केल्यामुळे त्यांना त्यांच्या मार्गात जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधता आला.  योगेश  आलेकरी  म्हणाले ,  भूतानमध्येफक्त भारतीयांना येथे जाण्यासव्हिसा अथवा पासपोर्ट लागत नाही. त्यांना इलेक्शन कार्डावरती प्रवेश दिला जातो. परंतु इतर परदेशी नागरिकांना व्हिसा / पासपोर्ट आवश्यक आहे. पुष्कळ बाबींमध्ये भूतान भारतावरच विसंबून आहे. प्रामुख्याने संरक्षण व इंधन. नागरिकांचे जीवन शेती व पर्यटन या व्यवसायावरच चालते. कमाईची इतर साधने अस्तित्वातच नाहीत.  शेती व्यवसायातून भाताचे पीक घेण्यात येते.  भुतांची जनता व सरकार स्वचछते बाबत खूपच आग्रही आहेत. तेथे तंबाखू खाणे व सिगारेट ओढणे यास बंदी आहे. भौगोलिक दृष्ट्या भूतान हा देशभारत व चीन या दोन देशांच्या मध्ये आहे. त्यामुळेत्यांना भारतातील तसेच चीनमधील प्रदूषणाचा संभाव्य धोका आहे .  हा धोका टाळण्यास भूतान या देशाने घनदाट जंगले  राखीव ठेवली  आहेत. तसेच न्यूट्रल कार्बन यंत्रणा राबवलेली आहे.तेथील जनता पोलिसी बडगा व सिग्नल यंत्रणा नसूनही अत्यंत शिस्तप्रिय आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळून व इतर मौसमात घनदाट जंगलामुळे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यातून एकाच वीजनिर्मितीचा कारखाना आहे. लोकवस्ती तुरळक असल्यानेजनतेला मोफत वीज पुरवणे भूतान सरकारला परवडते. तसेच जनता त्यांना मिळणाऱ्या या सवलतीबद्दल फारच जागरूक आहे. विजेचा कुठेही व कोणत्याही कारणास्तव अपव्यय केला जात नाही. त्याचा फायदा आम जनतेला होतो. भूतान सरकारतर्फे भूतान नागरिकांना शिक्षण आणि आरोग्यसेवा पूर्णतः फुकट मिळते. 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email