भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानचा भीक  मांगो  आंदोलनाचा  इशारा

कोपर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुल नसल्याने प्रवाशांचे जातात जीव
      ( श्रीराम कांदू )
   डोंबिवली शहराजवळील कोपर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेकडे पादचारी पूल नसल्याने नागरिकांना रेल्वे रूळ ओलांडून प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकांचा रेल्वे अपघातात जीव गेले. भोपरकर सामाजिक प्रतिष्ठानने अनेक वेळेला रेल्वे प्रशासनाकडे पूल व्ह्यासाठी मागणी केली. गुरुवारी सायंकाळी रेल्वे रूळ ओलांडताना दोघांचा लोकलच्या धडकेत मृत्यू झाल्याने संतापलेल्या प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते  आणि मनसे आणि शिवसेनेने  डोंबिवली रेल्वे उपप्रबंधकाची भेट घेतली. मेट्रो आणि बुलेट ट्रेन नको प्रवाशांचा जीव वाचवा असे सांगत कोपर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलासाठी भीक  मांगो  आंदोलनाचा इशारा दिला.
          अनेक वर्षांपासून कोपर रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेने पादचारी पूल नसल्याने अनेकांचे जीव गेले. याला रेल्वे प्रशासन जबाबदार असून रेल्वे प्रशासनाकडे जर याठिकाणी पूल बांधण्यास निधी  नसेल तर भोपरकर सामाजिक प्रतिष्ठान भीक मांगो  आंदोलन करून जमलेले पैसे र रेल्वे प्रशासनाला देऊ असा इशारा प्रतिष्ठानचे पदाधिकारी गजानन पाटील यांनी  यावेळी दिला. तर मनसेचे शाखाध्यक्ष अरुण जांभळे  यांनी मनसेने  याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार केले आहेत. जे अश्या प्रकारे प्रवाशांचे जीव जात असतील तर मनसे स्टाईलने आंदोनल करू असे सांगिलते . यावेळी संदीप .( रमा ) म्हात्रे , राजू पाटील , हर्षद देशमुख आदीनी डोंबिवली रेल्वे उपप्रबंधकाची भेट घेतली. तर यावेळी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांचे जीव जावू नये तात्पुरती उपाययोजना करण्याबाबत उपप्रबंधकास सांगितले. मात्र तुमच्या मागण्याचे पत्र आम्हाला द्या असे प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांना  यावेळी उपप्रबंधकाने सांगितलॆ

Leave a Reply

Your email address will not be published.