भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिकेच्या तीन लिपिकांविरोधात गुन्हा दाखल
भिवंडी : भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिकेच्या तीन लिपिकांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे . भिवंडी निजामपूर महापालिकेचे तीन लिपिकांनी अवैध प्रकारे प्रॉपर्टी टैक्स वसूल केल्या प्रकरणी ही तक्रार नोंदवण्यात आली आहे . राजेंद्र गायकवाड़, जयवंत सूर्यवंशी, धर्मेंद्र यादव अशी या लिपिकांची नावे असून त्यांच्यावर कामचुकारपणा, लापरवाही , आर्थिक भ्रष्टाचार असे आरोप ठेवाल्याचा दुजोरा पीआरओ मिलिंद ससुले यानी दिला आहे. . पालिका आयुक्त डॉ योगेश म्हस्के यांच्या आदेशानुसार उपायुक्त विनोद सिंगटे यांनी विधि अधिकारी अनिल प्रधान यांना या प्रकरणी तक्रार नोंदवायाचे आदेश दिले. त्या नुसार अनिल प्रधान यांनी या तिघांविरोधात भा द वि ४६८ ,४७१, ४२०,३४ च्या अंतर्गत निजामपुरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.या तिघांनी पालिका प्रभाग समिती क्रमांक १ च्या अंतर्गत ४४३ /२ ४४३ /३ या प्रॉपर्टीचे अवैध प्रकारे कागतपत्र बनवुन कर वसूलला तसेच या कर वसूलीत त्यांनी संबंधी अधिकारी मोरेश्वर पाटील यांचे बोगस हस्ताक्षर करुन महापालिका कार्यालयातील संगणकात सत्य प्रति(ट्रू सटिफिकेट्स) पण बनवुन दिली होती.