भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहापदरीकरणाला मंजुरी….छोट्या वाहनांना २०३६ पर्यंत टोल भरावा लागणार ?
भिवंडी-कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या सहापदरीकरणाला मंजुरी….छोट्या वाहनांना २०३६ पर्यंत टोल भरावा लागणार ?
पथकर स्थानकाची सुधारणा करिता 25.66 कोटी रुपये खर्च केले जाणार…
छोटया वाहनांना जर टोल आकरला तर मनसे करणार विरोध….
भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी तो सहापदरी करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याने मंजुरी दिली आहे. सुमारे ३९० कोटी खर्च होणार असून तो वसूल करण्यासाठी या रस्त्यावर २०३६ सालापर्यंत टोल द्यावा लागणार आहे. राज्यातील सर्व टोल बंद करण्याची घोषणा
करणाऱ्या भाजपा-शिवसेना सरकारनेच यारस्त्यावर टोलचा प्रस्ताव मांडला आहे.तर पथकर स्थानकाची सुधारणा करिता 25.66 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता मुंबई-अहमदाबाद, मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे, कल्याण-निर्मल-नांदेड या महामार्गांना जोडणारा आहे. सध्याच्या घडीला सर्वाधिक रहदारीचा रस्ता आहे. त्यामुळे प्रवासी वाहनांप्रमाणेच अवजड वाहनांची मोठी वाहतूक या रस्त्यावरून रात्रंदिवस सुरू असते. त्यातच हा रस्ता भिवंडी, कल्याण आणि डोंबिवली या गजबजलेल्या शहरांमधून जातो. त्यामुळं या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावू लागलीये. यावर उपाय म्हणून राज्य सरकारनं या रस्त्याच्या सहापदरीकरणाला मंजुरी दिलीये. २१ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण ३८९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हे काम केलं जाणार आहे. त्यासाठी २०३६ सालापर्यंत टोलवसुली सुरू राहणार आहे.यावर सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अस्तित्त्वात असलेलेच टोलनाके सुरू राहतील, असे सांगितले आहे. मात्र अस्तित्त्वातील टोलनाक्यांकडून सध्या छोट्या वाहनांना सूट दिली जात असून रस्त्याच्या रुंदीकरणानंतर मात्र सर्वच वाहनांना टोल भरावा लागणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.
कल्याण शीळ रोड वरील टोल नाक्यावरून फक्त हेवी वेईकल करता टोल वसुली केली जाते.जर या रस्त्याचे काम केल्या नंतर जर छोट्या वाहनांना सूट नाही दिली तर या पूर्वी सारखेच मनसे स्टाईल ने आंदोलन केले जाईल असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष मनोज घरत यांनी दिला आहे.तर मनसेने नेते राजू पाटील यांनी टीका करत आता कुठे गेली टोल मुक्तीची घोषणा असा प्रश्न सरकारला विचारला आहे.
सहा पदरी करिताना प्रमुख खर्च …..
भूसंपादन – ९० कोटी
पथकर स्थानकाची सुधारणा – 25.66 कोटी
रस्त्यावरील बांधण्यात येणार विविध ठिकाणचे पूल – 50 कोटी
बांधकाम कालावधीत भाववाढ- 17 कोटी ( 3 वर्षासाठी)
सदर रस्त्यावरील पथकर स्थानकासाठी 25 कोटी रुपये लागतात का प्रश्न असून
आता छोट्या वाहनांना टोल लागणार का हे पाहावे लागेल