भिवंडीत केमीकलच्या गोदामाला आग
गणेश कंपाउंड गुंदवली केमीकलच्या गोदामाला भंयकर आग…
भिवंडी – आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी, कल्याण, उल्हासनगर,अंबरनाथ, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल 10 तास लागले .सध्या कूलिंगच्या काम चालू आहे, या आगीत कोट्यवधी रुपयांचे गोदामातील साहित्य जळून खाक झाले आहे. गोदामांमध्ये साठवून ठेवलेले ऑईल आणि टायर देखील जळून खाक झाले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.