भिवंडीतील हॉटेल साठी अन्न व औषध प्रशासनातर्फे कार्यशाळा
श्रीराम कांदु
ठाणे दि. २६ : भिवंडीतील हॉटेल ,रेस्टोरेंट ,खानावळ , वडापाव विक्रेते इत्यादी ठिकाणी तयार होणारे अन्नपदार्थ व विक्रीस असलेले अन्य पदार्थ दर्जेदार असावेत व त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होऊ नये म्हणून पदार्थ बनविताना घ्यावयाची काळजी व परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन ह्या हेतूने २८ ऑक्टोबरपर्यंत भिवंडी तालुक्यात कार्यशाळा सुरु आहे.
संबधीत व्यावसायिकांना कायद्यातील तरतूदी माहिती करून देण्याचा यामागे हेतू आहे. २७ नोव्हेंबर रोजी कोनगाव उत्तर भिवंडी ग्रामीण परिसरातील व्यावसायिकांकरता के. एन पार्क कल्याण नाका रांजनोली गाव ,भिवंडी , २८ नोव्हेंबर रोजी काल्हेर ,पुर्णा ,रेहनाळ परिसरातील व्यावसायिकांकरिता देसी तडका हॉटेल ,रेहनाळ, अंजूर फाटा भिवंडी येथे आयोजित कार्यशाळेस सर्व अन्न व्यावसायिकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन एम .एन. चौधरी सहायक आयुक्त (अन्न ) परिमंडळ -५ अन्न व औषध प्रशासन भिवंडी यांच्यावतीने करण्यात आले आहे.