भिंत फोडून दुकानात लाखोंची चोरी
डोंबिवली : कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीचे सत्र दिवसा गणिक वाढत चालले असून नागरिक ,दुकानदार दहशतीच्या वातावरणात आहे .त्यातच काल डोंबिवली मध्ये केळकर रोड वरील एका दुकानाची भिंत फोडून ,ग्रील वाकवून दुकानातील 4 लाख 55 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली .या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
डोंबिवली पुर्वेकडील केळकर रोडवरील शूटिंग शर्टिंंग रेडिमेड हे दुकान रात्रीच्या सुमाराला बंद करून दुकानमलकासह कर्मचारी घरी निघून गेले .दुकानाला कुलूप असल्याची संधीं साधत अज्ञात चोरट्यानी दुकानाच्या बंद गॅलरीच्या भिंतीच्या विटा फोडून ग्रील वाकवून त्यावाटे दुकानात घुसून दुकानातील काउंटरचे लॉक तोडून तिजोरी मधील 4 लाख 55 हजारांची रोकड लंपास केली .सकाळी दुकान उघडल्या नंतर त्यांना दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले .या प्रकर्णी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात अली असून या तक्रारी नुसार पोलिसांंनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: