भिंतीला भगदाड पाडत लाखोंचा मुद्देमाल लंपास – डोंबिवलीतील घटना

कल्याण – कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांनी एकच धुमाकूळ घातला असून रात्रीच्या सुमारास बंद घरे ,बंद दुकाने हेरून चो-या करण्याचा सपाटा लावला आहे. डोंबिवलीत चक्क दुकानाच्या भीतीला भगदाड पाडून दुकानातील लाखोंचा मुद्देमाल लंपास केला आहे .

टीटवाळा येथे राहणारे नामदेव चौधरी यांचे डोंबिवली पूर्वेकडील कन्ज्युमर सोसायटी येथे कपड्याचे दुकान आहे .३ तारखेला ते दुकान बंद करून दोन दिवसा करिता बाहेर गेले होते. हि संधी साधत अज्ञात चोरट्याने या दरम्यान रात्रीच्या सुमारास दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या भीतीला दोन फुटाचे भगदाड पाडून दुकानात प्रवेश करत महागडे कपडे ,बग ,पट्टे असे मिळून एकूण १ लाख ३१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला तसेच दुकानातील सामानाची नासधूस केली.

पाच तारखेला दुकान उघडले असता चौधरी यांना दुकानात चोरी झालायचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email