भाड़े नकारणा-या रिक्षाचालकां विरोधात ठाणे शहर वाहतुक शाखेची जोरदार मोहिम
श्रीराम कांदू
ठाणे-जवळच्या अंतराचे भाड़े नकारणा-या रिक्षाचालकां विरोधात ठाणे शहर वाहतुक शाखेने जोरदार मोहिम राबवली आहे.वाहतुक शाखेचे उपायुक्त अमित काळे यांच्या संकल्पनेतुन सदर मोहिम रावाबिण्यात आली असून या अंतर्गत दोन महिन्यात २११५ रिक्षांवर कारवाई करत पोलिसांनी सुमारे ४ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. जवळच्या अंतराचे भाड़े नकारणा-या रिक्षा चालकांविरोधात ठाण्यातील जनतेने मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या होत्या.या वाढत्या तक्रारी लक्षात घेता सदर मोहिम राबवण्यात आली.साध्या वेशात जावून पोलिसांनी प्रवासी असल्याचे भासवून ते रिक्षात बसत व रिक्षाचालकाने भाड़े नकारल्यास तात्काळ करवाई करत.दरम्यान सदर करवाई लक्षात घेता जवळच्या अंतरासाठी रिक्शा न मिळण्याची प्रवाश्यांची समस्या आता सुटू लागल्याचे चित्र ठाण्यात दिसू लागले आहे.
Please follow and like us: