भावाच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्याने मिळवले ८० टक्के गुण

निखिलचा भाऊ सिध्येशने राहत्या घरात आत्महत्या केली होती . याचा धक्का निखिलला मानसिक धक्का बसला होता. त्याला या मानसिक धक्यातून बाहेर काढून बारावीची परिक्षा द्यायला कसे तयार करायचा हा मोठा प्रश्न बळीराम भोसलेच्या समोर उभा राहिला होता. निखिलला आधार देत त्याच्या कुटुंबाबरोबर दिवा प्रवासी संघटना आणि सर्व सभासद आधाराला उभे राहिले. बळीराम भोसलेंच्या घरातील सर्वांना सांत्वन करुन आधार दिला. त्यांचा मोठा मुलगा निखिल बारावीला तर लहान मुलगा रोहित दहावीला होता. भावाच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून निखिलने ८० टक्के मिळवले. या सुयशामुळे निखिलला चॉकलेट आणि पुष्पगुच्छ देऊन दिवा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत, सरचीटणीस श्रावणी गावेड व इतर सभासदांनी त्याचा सत्कार केला.
Please follow and like us: