भावाच्या मदतीने केली पतीची हत्या :टिटवाळा येथे गोणित सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकलले
टिटवाळा –गळया पासून मुंडके व कमरे पासून खालचा भाग कापुन अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करून गोणीत बांधलेल्या मृतदेहाचे गुढ अखेर उकलले आहे.पत्नीनेच तिच्या भावाच्या मदतीने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी पोलिसांनी तिच्या भावाला अटक केली आहे.तर मयत इसमाच्या पत्नीचा पोलीस शोध घेत आहेत.
काही दिवसांपूर्वी टिटवाळा- मांडा परिसरात गळया पासून मुंडके व कमरे पासून खालचा भाग कापुन अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करून गोणीत बांधलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडली होती. या हत्येचा तपास करताना पोलीसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. ठाणे ग्रामीण क्राईम ब्रांच पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. ही हत्या कौटुंबिक वादातून झाली असून पत्नी व तीच्या भावाच्या मदतीने पतीची निर्दयी हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत व्यक्तीचे नाव रवींद्र शिवगण असून त्याची हत्या पत्नी सुषमा व मेव्हणा गौतम यांनी केली असून पोलिसांनी गौतमला ताब्यात घेतले आहे . कौटुंबिक वादातून रवींद्र शिवगण या तरुणाची त्याची पत्नी सुषमा शिवगण व मेव्हणा गौतम मोहिते याने निर्दयी हत्या करून त्याचे गळयापासून मुंडके व कंबरेपासून खालचा भाग कापून गोणीत बांधून टिटवाळा- मांडा परिसरतील सलमान चाळीच्या मागे काळू नदिच्या किनारी फेकून दिला होता.यामध्ये पोलिसांसमोर छिन्न-विछिन्न अवस्थेतील गोणीत बांधलेला अज्ञात मृतदेहाची ओळख पटवणे व मारेकऱ्याचा शोध घेण्याचे आव्हान उभे राहिले होते अखेरीस ठाणे ग्रामीण क्राईम पोलीस व टिटवाळा पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी याप्रकरणी कसून शोध सुरु केला आणि ठाणे ग्रामीण क्राईम पोलीसांनी या हत्येचा छडा लावला. सदरची हत्या वारंवार पती पत्नीमध्ये होणाऱ्या घरगुती वादातून झाली.पत्नी सुषमा हिने आपला भाऊ गौतम याच्या मदतीने पती रविद्रची निर्दयी हत्या करीत मृतदेह फेकून दिल्याचे पोलीस तपासात समोर आले.पोलिसांनी मृत व्यक्तीचा मेव्हणा गौतम याला अटक करीत टिटवाळा पोलीसांच्या ताब्यात दिले असून मयताची पत्नी सुषमा हिचा पोलीस शोध घेत आहेत .