भारत देशाचा नैराश्यात दुसरा क्रमांक – मानसोपचारतज्ञ डॉ. अव्दैत पाध्ये

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.११ – स्मार्ट मोबाईल फोन,स्मार्ट सिटी प्रमाणे आता आपली जीवनशैलीही स्मार्ट झाली असून त्याने अनेक प्रश्न निर्माण केले आहे त्याचा परिणम मनावर,शरीरावर होत असून मानसिक ताण-तणावामुळे आत्महत्या वाढल्या आहेत सध्या आपल्या देशात हृदयरोगाचा पहिला क्रमांक आहे , आता दुसरा क्रमांक नैराश्याचा आहे व त्याचा विळखा देशाला बसत आहे असे प्रतिपादन मानसोपचारतज्ञ डॉ. अव्दैत पाध्ये यांनी केले.

डोंबिवली पत्रकार संघाने आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात डॉ. पाध्ये बोलत होते. देशातील लोकसंख्येच्या आठ ते दहा टक्के लोक नैराश्याने बाधित असून काल आपण याकडे दुर्लक्ष केले आज सजक झालो असून उद्याचा विचार करण्याची गरज त्यानी व्यक्त केली.सध्या देशात वाढत्या आत्महत्याबददल चिंता व्यक्त करुन डॉ. पाध्ये म्हणाले, देशात मानसिक उपचार करणाऱ्या डाँक्टरांची कमतरता आहे. वर्षाला अवघे ४०० ते ५०० डाँक्टर निर्माण होतात. त्यांची संख्या वाढायला हवी.२०१७ च्या मानसिक आरोग्य कायद्याप्रमाणे मानसिक रुग्णांना असाध्य रुग्णांप्रमाणे आर्थिक सहाय्य प्राप्त व्हावे. आत्महत्या करण्यामागे बदलती जीवनशैली आहे. काहिंचे कोंडीत सापडलेले असते. त्यातून १५% लोक आत्महत्येचा प्रयत्न करतात. त्यातील ५% आत्महत्या करतात. शालेय किंवा महाविद्यालय स्तरावरील मुले आत्महत्या करतात. त्यांना संवादाची गरज असते. तो आवश्यक असतो. शिक्षक पालक यांनी त्यास समजून घ्यावे हि गरज असते. समस्या काय आहे हे निदान होत नाही. समस्या चिघलत जाते. शिक्षणाचे ओझे व सरधोपट पध्दतीत सुधारणा व्हायला हवी. माणूस जेव्हा कोंडीत सापडतो तेव्हा तो आत्महत्या करतो. जीवनशैलीमुळे तरुण एकाकी झाला असून आज ज्या आत्महत्या होत आहेत. त्या अनुकरणाने होत असून आपल्याला महत्व मिळावे,आपल्याकडे लक्ष जावे म्हणून हे घडत असल्याचे विश्लेषण त्यांनी केले. आज सरकारतर्फे आरोग्य विमा ज्या प्रमाणे काढला जातो त्या प्रमाणे आरोग्य विम्याची अत्यंत गरज असून यामुळे उपचारासाठी रुग्णावर,कुटुंबियांवर जो आर्थिक बोजा पडतो तो कमी होईल असा विश्वास त्यानी व्यक्त केला. तरुणांबरोबर लहान मुलांमध्येही नैराश्य आहे मुलांमध्ये नैराश्य,चिंता,अभ्यासाचे प्रश्न,यामुळे नैराश्य येत असून यामुळे तरुणांबरोबर लहानमुलांमध्ये नैराश्य वाढले असल्याचा इशारा त्यानी दिला. देशात जरी मानसिक रुग्ण वाढत असले तरी त्यामानाने उपचार करणारे अवघे पाच सहा हजार मानसोपचार तज्ञ असून ही संख्या वाढण्याची गरज असल्याचे मत त्यानी व्यक्त केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email