भारतीय रेल्वेने ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकं पूर्णपणे बंद करण्यासाठी हाती घेतली धडक मोहीम
भारतभरातील ब्रॉडगेज मार्गावरील मानवरहित रेल्वे फाटकं पूर्णपणे बंद करण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. 1 एप्रिल 2018 रोजी ब्रॉडगेज मार्गांवर 3 हजार 479 मानवरहित रेल्वे फाटकं होती. गेल्या सात महिन्यात यापैकी 3 हजार 402 फाटकं पूर्णपणे बंद करण्यात आली असून उरलेली 77 फाटकं डिसेंबर 2018 पूर्वी बंद करण्याची योजना आहे. मानवरहित रेल्वे फाटकांच्याऐवजी सब-वे उपलब्ध करून देऊन अथवा गार्ड नियुक्तीच्या माध्यमातून ही रेल्वे फाटके बंद करण्यात आली आहेत.
Please follow and like us: