भारतीय राज्यघटना जगात श्रेष्ठ – महेश पाटील
(श्रीराम कांदु)
जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे.भारतात विविध जाती ,धर्म ,पंथ आहेत. यातील एकोपा टिकवून ठेवण्याचे कार्य घटना करीत आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेसाठी खुप मेहनत घेतली.भारतीय राज्यघटना जगातील श्रेष्ठ राज्यघटना आहे. असे भाजप नगरसेवक तथा भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले
डोंबिवलीतील दि बुध्दिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने संविधान दिन आयोजित करण्यात आला होता.त्यावेळी नगरसेवक पाटील बोलत होते. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते देशाला अर्पण केली होती. त्यामुळे भारतभर २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या वेळी संस्थेचे संचालक दिनेश हिवराळे, मुख्याध्यापिका अँड.उज्वला हिवराळे,डॉ नितनवरे, समुद्राबाई हिवराळे, जयानंद कदम, मुणाली पाटील,पत्रकार नरेंद्र थोरावडे, उपस्थित होते. संविधान दिन कार्यक्रमात सर्व युगपुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार महेश पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते अर्पण केल्यानंतर भारतीय तिरंग्याचे ध्वजारोहण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर घटनेचे प्रास्ताविक विद्यार्थ्यांनी वाचले.संविधान दिनाचे महत्व संचालक हिवराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात मांडले.जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपल्या देशात आहे.भारतात विविध जाती ,धर्म ,पंथ आहेत. यातील एकोपा टिकवून ठेवण्याचे कार्य घटना करीत आहे.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेसाठी खुप मेहनत घेतली.भारतीय राज्यघटना जगातील श्रेष्ठ राज्यघटना आहे. असे नगरसेवक व भाजप ग्रामीण मंडल अध्यक्ष महेश पाटील यांनी सांगितले.जास्त परिचय नसताना सुध्दा संस्थेने संविधान दिनास ध्वजारोहण करण्यास निमंत्रित केल्याबद्दल नगरसेवक पाटील यांनी आयोजकांचे आभार मानले.संस्थेच्या वतीने पाटील यांचा सत्कार करण्यात आला.उपस्थितांचे आभार सुजाता नितनवरे यांनी मानले.