भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ (नियमन जारी करण्याकरीता यंत्रणा) नियमन 2018 अधिसूचना आयबीबीआयकडून जारी
नवी दिल्ली, दि.२३ – नादारी आणि दिवाळखोरी संहिता 2016 तील कलम 240 व्दारे भारतीय नादारी आणि दिवाळखोरी (प्रतिबंध) मंडळाला (आयबीबीआय) नियमन करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.
संहितेतील तरतुदींचे कार्यान्वयन
ही संहिता आणि याअंतर्गत करण्यात आलेल्या नियमांना अनुरूप असतील
गॅझेटमध्ये प्रकाशित अधिसूचनेच्या माध्यमातून ते करावे लागतील
लवकरात लवकर संसदेच्या प्रत्येक सदनात 30 दिवसांसाठी सादर करावे लागतील.
नियमन करण्याची प्रक्रिया आणि सल्लामसलत यासाठी आयबीबीआयने भारतीय नादारी आणि दिवाळखोरी मंडळ (नियमन जारी करण्याकरीता यंत्रणा) नियमन, 2018 अधिसूचित केले आहे.
Please follow and like us: