भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा मोर्चा पोलसांनी अडवला
डोंबिवली दि.२९ – कल्याण डोंबिवली क्षेत्रातील खाजगी आणि सहकारी जागेवरील धोकादायक इमारती-चाळी मधील राहणाऱ्या नागरिकाचा प्रश्न जटिल बनत चालला आहे. त्यांचे पुनवर्सन करण्यासाठी गृहनिर्माण योजना बाबत अनेक वेळेला आंदोनल केली, पत्रव्यवहार केला मात्र मुख्यमंत्री आणि राज्यमंत्री फक्त आश्वासन आणि घोषणाबाजीच केली. मात्र अद्याप प्रश्न निकाली लावला नाही. या करिता आज पुन्हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे राज राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर मोर्चा जाणार होता मात्र पोलिसांनी स्टेशनजवळ अनुकूल हॉटेल जवळ मोर्चा अडवला व आंदोलकांना ताब्यात घेतले.
धोकादायक इमारती-चाळी मधील राहणाऱ्या नागरिकांचे पुनवर्सन,पालिका हॉस्पिटल सिव्हिल दर्जा देणे आणि चांगल्या सुविधा मिळण्यासाठी डोंबिवली मध्ये राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यालयावर आज भारतीय कम्युनिस्ट पार्टी काढला. मोर्चा मध्ये भाजप विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. भाजपचे आमदार तथा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः डोंबिवली मध्ये भाडोत्री होते.तेव्हा त्यांना रहिवाशी यांच्या प्रश्नांची जाण होती.भाडोत्री वाक्याचे भांडवल करून सत्ते मध्ये आले. मात्र आज मंत्री झाल्यावर भाडोत्री रहिवाश्यांनकडे दुर्लक्ष केले आहे असा आरोप कॉम्रेड अरुण वेळासकर यांनी यावेळी केला. सदर मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला आणि मोर्चा मधील नागरिकांना पोलिस स्थानकात नेले.