भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे गुंतवणूकदारांना आमंत्रण
केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी खासगी गुंतवणूकदारांना भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. ते काल अबूधाबी येथे एका रोड शो दरम्यान बोलत होते. गेल्या चार वर्षात भारताने तेल आणि वायू क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केल्याचे ते म्हणाले. भागीदारी आणि सहकार्याशिवाय कोणताही देश, आंतरराष्ट्रीय संघटना किंवा कंपनी फार पुढे जाऊ शकत नाही असे ते म्हणाले.
हेही वाचा :- केंद्रीय रसायने आणि खते आणि संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांच्या निधनाबद्दल मंत्रिमंडळाकडून शोक व्यक्त
भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा ऊर्जा ग्राहक असून गेल्या दशकात भारतातील ऊर्जेची मागणी 5 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली आहे, असे ते म्हणाले. जागतिक स्तरावर यापुढे भारतातूनच बहुतांश ऊर्जेची मागणी राहील असे ते म्हणाले.
वायू आधारित आणि स्वच्छ अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्याला भारताचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले.