भाजीवाल्यांना लुबाडणारे दोन चोरटे गजाआड – कल्याणमधील घटना
कल्याण दि.१४ – कल्याण पूर्व परिसरात राहणारी राधिका पुजारी ही महिला कल्याण स्टेशन रोड लगत असलेल्या फुट पाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय करते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास भाजी विक्री करत असतांना दोन तरुण दुचाकीवरूण त्या ठिकणी आले त्यांनी पुजारी यांच्या हातातील पाकिट खेचण्याचा प्रयत्न केला मात्र पुजारी यांनी प्रतिकार करत आरडा ओरड केली असता त्यांनी त्यांचा उजवा हाथ पिळून त्यांचे २ हजार २०० रुपये रोकड असलेले पाकीट खेचून पळ काढयाचा प्रयत्न केला यावेळी त्याच्या सोबत असलेल्या उषाबाई या महिलेने देखील पुजारी यांना सोडवण्याचा प्रयत्न केला असता या दोघांनी त्यांना देखील मारहाण केली मात्र या आरडा ओरड एकूण आसपासच्या नागरिकांनी या दोन्ही चोरट्यांना पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. रोहित गायकवाड आणि प्रतिक सैंदाणे असे या चोरटयांची नावे आहेत.