भाजप समर्थित आमदार गणपत गायकवाड यांना ५० लाखाच्या खंडणी साठी धमकी,

( जय दूबे )

गुंड सुरेश पुजारीने दिली धमकी
कल्याण :ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा खंडणी सत्र सुरू झाले असून कळव्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नंतर आता कल्याण पूर्वेचे आमदार आणी केबल व्यवसायीक गणपत गायकवाड यांना १५ नोव्हेंबर रोजी सुरेश पुजारी या गुंडाने धमकी देत ५० लाखाच्या खंडणीची मागणी केली आहे.या बाबत आमदार गायकवाड यांनी या बाबतची तक्रार पोलिसात दाखल केली आहे.
सुरेश पुजारी या गुंड मेलेशियात असून तो व्यवसायीकांना धमकावून खंडणी वसूल करण्याचे काम करीत असतो. या पूर्वी अशीच धमकी कळव्याचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना दिली होती.या बाबत जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहून आपल्या बाबत काही अप्रिय घटना घडल्यास त्यास आपण जबाबदार असल्याचे म्हटले होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email