भाकरीसाठी धड़पडणाऱ्या फेरीवाल्याच्या पोटावर पाय देणे चुकीचे आहे:- नाना पाटेकर

(गणेश मगरे )

फेरीवाला ची व्याख्या नक्की काय ? जो फेरीवाला फिरतफिरत व्यवसाय करतो, त्याला फेरीवाला म्हणतात. एकाच जाग्यावर ठाण मारून जागा अडवून व्यवसाय करतो त्याला फेरीवाला म्हणत नाही. तो त्या जागेत अतिक्रमण करतो. समजते का नाना..!!  चोर पण पोट भरण्यासाठीच चोरी करतो, मग तुम्ही म्हणाल त्याला पण कशाला पकडता.                                                                                             प्रत्येकजण जे काम करतो ते स्वतःच्या पोटासाठीच करतो, म्हणून मग अनधिकृत कामांना पण पाठीशी घालायच का ? विरोध सर्व फेरीवाल्याना नाही तर विना परवाना आणि अनधिकृत जागेत बसणाऱ्याना आहे

फेरीवाले गरीब आहेत मान्य आहे ।। पण अधिकृत जागेवर धंदा केला तर त्यांना कोणी अडवलं आहे काय ??? आपल्याला जर परदेश देशासारखे स्मार्ट सिटी बनवायच्या असतील तर शिस्त ही लावलीच पाहिजे, नाहीतर हा बकालपणा वाढतच जाणार.

शेतकरी पण भाकरीसाठी धडपडतो, पण अनधिकृत धंदे नाही करत, महाराष्ट्राचा शेतकरी तोही प्रामाणिकपणे काम करतो. आजपर्यंतच्या सर्व सरकारने अन्याय करूनही महाराष्ट्राच्या शेतकर्यांनी कधी गांजा नाही पिकवला मग रोजचा 2-3 हजार गल्ला असणाऱ्या कमर्शियल भागात अनधिकृतपणे धंदा करणाऱ्या फेरीवाल्याना गरीब कस म्हणता येईल. नाना, तुम्ही माटुंग्याला राहता. जरा माटुंगा ( पूर्व ) त्या मंडईत जाऊन एक फेरफटका मारा. मंडई हि भाजी विक्री करिता राखीव आहे. पण परप्रांतीयांनी मोबाईलची दुकाने तिथे थाटलेली आहेत. मंडईत भाजी विक्रीच व्हायला पाहिजे. घेता का पुढाकार शेतकऱ्यांना मंडईतले गाळे मिळवन देण्यासाठी…, चला आम्ही तुमच्या सोबत असू..!!.

नाना, तुमचे नाम फाउंडेशनचे कार्य वाखाणण्याजोगी, पण मला कळेल का किती UP, BIHARI च्या लोकांनी नाम फाउंडेशनला देणगी दिली, कोणत्या UP, BIHAR, UTTARAKHAND, UTTAR PRADESH सरकारने तुमच्या नाम फाउंडेशनला देणगी दिली.? श्रमदान गावकऱ्यांचे घेतलेच ना. एवढा पुळका वाटत असेल तर जाऊन रहा त्यांच्या राज्यात, तिथेही समाजकार्य करता येईल..

नाना, यावेळी मात्र तुम्ही चुकलात….!!!
चुकीला माफी नाही….!!!!

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email