भांडण सोडवण्या-या बहिणीचा भावानेच केला खून

भिवंडी –भावाचे व वहिनिचे होत आसलेले भांडण मिटवायला गेलेल्या बहिणीचा भावानेच खून केल्याची घटना नुकतीच घडली .या प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिप्पमाबाई सोनू शिंदे असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. तर लक्ष्मण देवराम कुराडे असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या भावाचे नाव आहे.बहीण तिप्पमाबाई पतीच्या निधनानंतर गेल्या आठ वर्षांपासून आपला भाऊ लक्ष्मणच्या घरी राहत होती. शनिवारी सायंकाळी लक्ष्मणचे पत्नी अलकाबाई हिच्यासोबत क्षुल्लक भांडण झाले. यावेळी लक्ष्मण याने पत्नी अलका हिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी भांडण सोडवण्यासाठी बहीण तिप्पमा गेली असता, लक्ष्मण याने धारदार चाकू तिप्पमाच्या छातीत खुपसून तिचा खून केला.या हत्येप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात लक्ष्मण कुराडे याच्या विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक कुलदीप मोरे यांनी आरोपी लक्ष्मण कुराडे यास अटक केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.