कल्याणमध्ये भांडण सोडवण्यास गेलेल्या तरुणासह आईवर हल्ला

(श्रीराम कांदु)

कल्याण – कल्याण पुर्वेकडील आनंद वाडी मुकादम चाळीत राहणारे श्याम मुनेश्वर याच्या भावाचा काल संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच परिसरात राहणार्या ज्ञानेश्वर दराडे यांच्या सोबत भांडण सुरू होते. हे भांडण सोडवण्यासाठी श्याम ने प्रयत्न केला असता संतापलेल्या ज्ञानेश्वर ने त्याला व त्याच्या आईवर धारदार वस्तूने हल्ला केला .या हल्ल्यात श्याम व त्याची आई जखमी झाली या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली असून या तक्रारी नुसार पोलिसानी ज्ञानेश्वर दराडे विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केल आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email