भरधाव वेगाने गाडी चालवत असल्याने जाब विचारणाऱ्या केडीएमसी बस ड्रायव्हरवर ट्रक चालकाने मारण्यासाठी काढली तलवार ….

श्रीराम कांदु 
कल्याण शुक्रवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान केडीएमटीची  उसटणे कल्याण ( एमएच05 आर 1241) ही बस  कल्याणच्या दिशेने नेतीवली नाका जवळ येत असताना टनिंग घेत असताना समोरून एक ट्रक (P.B.46.M.4907)भरधाव वेगाने  आल्याने  खचाखच भरलेल्या बस मधील प्रवाश्यांच्या जीवावर बेतले असते म्हणून केडीएमटी बसचालक विलास तलवारे यांनी  ट्रकच्या डायव्हरला जाब  विचारला असता संतप्त झालेला ट्रक चालक हरपित सिंग व त्याचा क्लिनर गुरपीत सिंग  या दोघांनी  आपल्या ट्रक मधील तलवार काढून बस चालकाला मारण्यासाठी धाव घेतली .थरारक प्रसंग भर रस्त्यात घडल्याने नेतीवली नाका येथे एकच खळबळ उडाली होती व वाहतूक कोंडी झाली होती .मात्र बस मधील प्रवाश्यांनी प्रसांगावधना राखून वेळीच मोठ्या  घटनेला आवर घालीत संतापलेल्या दोघा सरदारजी कडून सुटका केल्याने बस चालकाचा जीव वाचला सदरची घटना कळताच परिवहन उपक्रमाच्या अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली .सदर घटने प्रकरणी ट्रक चालक  हरपित सिंग व त्याच्या क्लीनरला पोलिसांनी कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.