भरधाव रिक्षाच्या धडकेत विद्यार्थी जखमी

(श्रीराम कांदु)

कल्याण दि.०१ – कल्याण पश्चिमेकडील रामदास वाडी बिर्ला कॉलेज परिसरात साखर पार्क मध्ये राहणारा आकाश थाटे १९ हा विद्यार्थी मंगळवारी दुपारी बिर्ला कॉलेज रोड ने घराकडे जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या रिक्षाने (रिक्षा क्रमांक एम एच ०५ डीक्यू ६७८६)त्याला जोरदार धडक दिली व रिक्षा चालक पसार झाला .या अपघात आकाश जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.या प्रकरणी काल महात्मा फुले पोलीस स्थानकात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी नुसार पोलिसानी फरार रिक्षा चालकाविरोधता गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email