भरधाव कारचा अपघात १ जण ठार तर ३ जण जखमी
ठाणे- भरधाव कारचा अपघात होवून १ जण ठार तर ३ जण जखमी झाल्याची घटना शहरात घडली.याप्रकरणी चितळसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.मुल्लाबाग विभागत सोमवारी मध्यरात्री १.४५ च्या दरम्यान एका सोसायटीच्या गेटवर भरधाव कार आद्ळली.या अपघातात गाडी चालवणारे सुजीत रॉय यांचा मृत्यू झाला तर अन्य ३ जण जखमी झाले.करणसिंग (२५),जुवेल शहा(२९)व ज्योतिर्मय राजकुमार (२९)अशी या जखमींची नावे आहेत.या प्रकरणी चितळसर पोलिसात नोंद करण्यात आली आहे.