भरदुपारी वृद्ध इसमाला लुबाडले – डोंबिवलीतील घटना
कल्याण दि.२६ – कल्याण डोंबिवली मध्ये भुरट्या चोरट्यांचा उपद्रव वाढला असून रस्त्याने पायी चालणाऱ्या वृद्ध नागरिकांना भूलथापा देत बोलण्यात गुंतवून त्यांना लुबाडण्याचे प्रकार वाढले आहे डोंबिवली मध्ये अशीच एक घटना समोर आली आहे .डोंबिवली पूर्वेकडील भोपर माऊली नगर येथे राहणारे 63 वर्षीय गजानन कांबळे काल दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्टेशन नजिक असलेल्या भाजी मार्केट मध्ये भाजी खरेदी करण्यास गेले होते.
त्या ठिकाणी असलेल्या एका दुकानाच्या शेजारच्या गल्लीत ते गेले असता दोन अज्ञात इस्मानी त्याला हटकले. या दोघांनी कांबळे याना बोलण्यात गुंतवून त्याच्या जवळील सोन्याचे चैन ,कडे ,रोकड ,घड्याळ असा मिळून एकूण 1 लाख 8 हजारांचा मुद्देमाल स्वतः जवळील रुमालात काढून ठेवन्यास सांगत 100 पाऊले पुढे चालत जाण्यास सांगितले. कांबळे पुढे गेले असताना या भामट्यानी त्यांच्या जवळ ठेवलेले दागिने घेऊन तेथून पसार झाले. कांबळे यांना आपली फसवनुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास।सुरू केला आहे .