भरदिवसा ठाणे शहरात तरुणीवर चाकुने वार
ठाणे दि.०४ – ठाण्यामध्ये एका २० वर्षीय तरुणीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली असून प्राची झाडे असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोयं. प्राची झाडे ही तरुणी ठाण्याच्या जोशी-बेडकर महाविद्यालयात वाणिज्य विभागतील दुसऱ्या वर्षात शिकत होती. चाकूने सपासप वार केल्यानंतर हल्लेखोर आकाश घटनास्थळावरुन फरार झाला. जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला असुन पोलिसांनी आकाश पवार नावाच्या आरोपीला भिवंडीतून ताब्यात घेतले आहे.
Please follow and like us: