ब्रेक दाबण्याऐवजी चुकून अॅक्सिलेटर दाबल्यामुळे पादचाऱ्यांना जोरदार धडक
मुंबई – गाडीवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवल्यामुळे पाच पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याची घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली. सुदैवाने यामध्ये कोणती जीवितहानी झाली नसली तरी ५ जण जखमी झाले, जखमींमध्ये एका चिमुकल्याचाही समावेश आहे. ध्रुवी जैन असं या तरुणीचं नाव असून ती वकिलीच्या पहिल्या वर्षाचं शिक्षण घेत आहे. ती आणि तिच्या ३ मैत्रिणी वांद्रे येथे जात असताना हा अपघात झाला. मंगळवारी संध्याकाळी धारावीजवळ हा अपघात झाला. संबंधित तरुणीने कार भाड्यावर घेतली होती. पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर तरुणीने स्वतःची चूक असल्याचं मान्य केलं. गाडीवर ताबा मिळवण्यासाठी ब्रेक दाबण्याऐवजी मी चुकून अॅक्सिलेटरवर पाय ठेवला. त्यामुळे माझा गाडीवरील ताबा सुटला आणि पादचाऱ्यांना धडक बसली असं तिने पोलिसांसमोर कबुल केलं.
Please follow and like us: