* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> बॉक्सिंगमध्ये भारताला सुवर्णपदक – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

बॉक्सिंगमध्ये भारताला सुवर्णपदक

बॉक्सर अमित पंघलने ४९ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. तर ब्रिज खेळात प्रणब बर्धन आणि शिभनाथ सरकार यांनी सुवर्णपदकाला गवसणी घातली. आशियाई क्रीडा स्पर्धेत अखेरच्या दिवशी भारताने आतापर्यंत दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. अंतिम फेरीत २२ वर्षीय अमित पंघलने उझबेकिस्तानच्या ऑलिम्पिक विजेत्या हंसबॉय दुस्मातोवला ३-२ अशा फरकाने पराभूत केले. अमितच्या या सुवर्णपदकाबरोबरच भारताची सुवर्णपदकांची संख्या १५ वर गेली असून भारताने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण ६७ पदके मिळवली आहेत. यंदाच्या स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवणारा अमित एकमेव भारतीय बॉक्सर ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *