बेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू

मुंबई, दि.२२ – आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन बेस्ट बसमध्ये चिरडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना कुर्ला बस डेपोमध्ये घडली असून मूर्तिजा शेख असे या २२ वर्षीय तरुणीचे नाव आहे. डेपोमध्ये दोन बस एकामागोमाग असलेल्या दोन बसच्या मधून मूर्तिजा शेख जात होती. मात्र त्याचवेळी एका बसने रिव्हर्स घेतल्याने ती बसखाली चिरडली गेली. मागेही बस असल्याने तिला बाजूला होता आलं नाही. तिला जखमी अवस्थेत जवळील भाभा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अमरीन सबा मूर्तिजा शेख ही बँक कर्मचारी होती. वांद्रे कुर्ला संकुलात ती काम करत असलेली बँक आहे. दरम्यान, पोलिसांनी बेस्ट बसच्या चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email