बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारे भामटा प्राध्यापक व शिक्षण उपसंचालन कार्यालयातील अधिकारी गजाआड
कल्याण दि.०७ – बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घालना-या एका प्राध्यपक आणि शिक्षण उपसंचालन कार्यालयात क्लार्क पदावर कार्यरत असणा-या दोन भामट्यान बाजार पेठ पोलीसांनी अटक केली आहे. या दोघांनी तब्बल दीड ते दोन कोटी रुपयांना गंडवले आहे यांच्या मागे मोठे रकेट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. राज्यभरातील आता पर्यंत ५० तरुण यांच्या आमिषाला बळी ठरल्याचे समोर आल आहे त्यांनी शेकडो बेरोजगार तरूणांना गंडा घातला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
कल्याण मध्य राहणा-या दिलीप थोरात तरुणाने काही दिवसापूर्वी कल्याण मधील नामांकित असलेल्या मोहिंदर सिंग काबुल सिंग महाविद्यालयात कार्यरत असणा-या प्राध्यापक राजेश थोरात याला रेल्वे मध्ये नोकरी लावून देण्यासाठी सहा लाख रुपये दिले होते. राजेश ने दिलीप ला नोकरी लावून देतो असे आमिष दिले होते मात्र दिलीप ने पैसे देताना शुटींग काढली होती मात्र पैसे देवून बराच कालावधी लोटला मात्र नोकरी न लागल्यान त्याने राजेष ला विचारणा केली मात्र त्याने उडवा उडवी ची उत्तरे दिली त्यामुळे दिलीप ला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
त्याने या प्रकरणी बाजार पेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली पोलिसांनी तपास सुरु केला या तपासा दरम्यान राजेष सोबत महेंद्र डांबरे नावाचा इसम या रकेट मध्ये सामील असून तो शिक्षण उपसंचालन कार्यालयात क्लार्क पदावर कार्यरत आहे या दोघांनी मिळून दिलीप सह कल्याण डोंबिवली ,मुरबाड ,शहापूर ,नाशिक ,कसारा ,कर्जत असा राज्यातील अनेक शहरातील गरजू बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून कुणा कडून दोन लाख कुणाकडून तीन लाख कुणाकडून चार लाख असे कोट्यवधी रुपये उकळले आहेत. या दोघांना पोलिसांनी अटक केली असून याच्या मागे मोठे रकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करत त्या दिशेने तपास सुरु असल्याचे सांगितले.