कल्याण – कल्याण पूर्वे कडील तिसगाव परिसरात राहणारा शंकर गायकवाड हा इसम गेल्या 18 मे पासून बेपत्ता होता याबाबत त्याच्या कुटुंबीयांनी कोलशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली होती .या प्रकरणाचा तपास सुरु असतांना गायकवाड यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे .शंकर याच्या पत्नीने आशाने त्यांची हत्येची 30 लाखंची सुपारी हिमांशू दुबे याला दिल्याची माहिती उघड झाली असून या मधील ४ लाख रुपये आशाने दुबे याला दिले होते .याबाबत ची कबुली आशाने पोलिसांना दिली .पोलिसांनी शंकर यांची पत्नी आशा व हिमांशू या दोघांना अटक केली आहे तर या प्रकरणातील राज सिंग ,प्रीतम ,जगन कोरी ,राहुल म्हात्रे हे आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .शंकर याना गुंगीचे औषध देवून एका रिक्षात बसवून ता बदलापूरच्या पुढे रेल्वे पटरी लगत एका निळ्या शेडचे पुढील मोकळ्या जागेत नेले तेथे त्यांना रिक्षातून उतरवून लाकडी स्ट्म्प ने डोक्यावर मारत चाकूने गळ्यावर वार करून शंकर यांची हत्या केली तसेच त्याचा मृतदेह लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे .दरम्यान आशा मोबाइल वर सतत चँटींग करत असल्याने पती पत्नी मध्ये होत असल्याने भांडणातून हि हत्या करण्यात आली कि प्रोपर्टिचा वाद होता याबात पोलीस तपास सुरु आहे.