बेकायदेशीर सावकार झावरे न्यायालयाच्या दारी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी,वर्षांपूर्वीची तक्रार जिल्हयात सावकारांकडून शोषण,पायबंदची गरज !

नगर – बेकायदेशिरपणे सावकारकी व्यवसाय करणारा वसंतराव गंगाधर झावरे रा.इवळे गी माळीवाडा यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा न्यायालयाच्या आवारात जेरबंद केले. एक वर्षापूर्वी पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील शिवराब आप्पाजी जासूद यांनी वसंतराव झावरे हा अवैध व्यवसाय करत असल्याची तक्रार केली होती.

सदर तक्रारीनूसार उपनिबंधक यांनी झावरे याच्या माळीवाड्यातील राहात्या घराची व आशा टॉकीज लगत असणार्‍या शिव इलेक्ट्रॉनिक्सची झाडाझडती घेतली होती.दरम्यान बेकायदेशिर सावकारकीबाबत कागदपत्र आढळून आले. यानूसार शेख अल्ता अब्दुल कादर, सहकार अधिकारी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात २६ जुलै २०१८ रोजी दिलेल्या र्यिादीवरुन झावरे विरोधात महाराष्ट्र सावकारी अधिनियमानूसार गुन्हा दाखल केला.

दरम्यान नमुद गुन्ह्याच्या अनुषंगाने एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांचे पथक सदर गुन्ह्यांचा तपास करत असताना आरोपी झावरे हा अ.नगर जिल्हा न्यायालयात येणार असल्याची गोपनिय माहिती पथकाला मिळाली.त्यानूसार पथकातील सहा.फौजदार नानेकर, पोलिस नाईक संदिप घोडके, रविंद्र कर्डिले, अशोक गुंजाळ, विजय ठोंबरे यांनी न्यायालयाच्या आवारात सापळा लावून आरोपी सावकार झावरे यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले.पुढील कारवाईसाठी आरोपीस कोतवाली हजर करण्यात आले आहे.

जिल्ह्यात सावकारांकडून शोषण

एकवर्षापूर्वी दाखल तक्रारीची दखल घेत झावरे सारख्या बेकायदेशिर सावकाराच्या मुसक्या आवळल्या खर्‍या.मात्र, जिल्ह्यात झावरे सारखे बहुतेक सावकर सर्वसामान्यांचे शोषण करत आहे.दरम्यान याबाबत तालुकानिहाय उपनिबंधक यांच्याकडे तक्रारी प्राप्त आहेत.

तर, अनेक जण या सावकाराविरोधात तक्रार न करता छळ करणे पसंत करतात.अन अखेर आत्महत्येचे पाऊल उचलतात.मध्यतंरी सोनई पोलिस ठाण्यात जाखेड उपनिबधकांनी सोनईच्या एका सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला होता.त्याचे पुढे का? ओम उद्योग समुहाचे मालक तथा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पवार यांचा मृत्यु हा सावकारकीच्या शोषणातूनच झाला असल्याचे उघड झाले. 

हे सर्वश्रुत आहे.श्री.पवार सारखे सावकारकीचे बळी ठरले असताना सर्वसामान्य लोकांची काय कथा ? वाजवी दराने कर्ज देवून मोठ्या प्रमाणात व्याजाची रक्कम झाल्ंयावर कर्जदाराची प्रापर्टी ताब्यात घेवून त्यांना भुमीहिन करणारे मोठे बोक्के जिल्ह्यात मोठ्या जोमाने अवैधामार्गाने सावकारी करत आहे.त्यामुळे झावरे प्रमाणे त्यांचाही बंदोबस्त झाल्यास बरे होईल.हिच सर्वसामान्यांची अपेक्षा.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email