बेकायदेशीर रित्या पिस्तुल बाळगणारा तरुण गजाआड – डोंबिवली नजीकची घटना

डोंबिवली दि.२२ – डोंबिवली नजीक असलेल्या बदलापूर रोड वरील खोनी नाका येथे एक इसम पिस्तुल घेऊन येणार असल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे डीसीपी संजय शिंदे, एसीपी रवींद्र वाडेकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजनान काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीसांच्या पथकाने खोणी नाका येथे सापळा रचला. या ठिकाणी एक तरुण संशयास्पद रित्या फिरताना आढळून आल्याने पोलिसांनी झडप घालत त्याला ताब्यात घेत त्याची चौकशी करत झडती घेतली. या तरुणांकडे एक पिस्तुल व दोन कारतुस आढळले. निखिल काळण ( १९ ) असे या तरुणाचे नाव असून तो बदलापूर रोड वरील हेदुटने गावातील रहिवासी आहे. पोलिसांना त्याला अटक करत त्याची चौकशी केली असता पिस्तुल त्याचेच असल्याची कबुली दिली असून पोलिसांनी पिस्तुल व दोन कारतुस जप्त केले आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email