बेकायदेशीर गर्भपात सेंटरवर छापा डॉक्टर दांपत्याला अटक
पंढरपुर-सांगोला येथील एका बेकायदेशीर गर्भपात सेंटरवर छपा टाकण्यात आला असून सोलापूरच्या भरारी पथकाने गर्भपात करताना डॉक्टर दांपत्याला रंगेहाथ पकडले .सांगोला पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
सांगोला शहरातील कडलास रोड येथील न्यू धनश्री हॉस्पिटल व मॅटर्निटी होम येथे गर्भपात करताना डॉ. सुहास जाधवर व डॉ.अश्विनी जाधवर यांना रंगेहाथ पकडले सोलापूरच्या भरारी पथकाच्या डॉ.अॅड.राजेश्वरी माने यांच्या पथकाने छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केला आहेया छाप्या दरम्यान 7 ते 8 महिलांचा गर्भपात केल्याचे प्राथमिक तपासात उघड होत आहे सोलापूर येथील भरारी पथकाच्या अॅड. राजेश्वरी माने यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक संदीप बेलपत्रे यांच्या पथकाने ही कारवाई केली.या छाप्या दरम्यान ऑपरेशन थिएटर, प्रसुति रूम दोन्ही सील केले आहे. व रूग्णांच्या संदर्भातील हॉस्पिटलची कागदपत्रे ताब्यात घेतली. या डॉक्टर दाम्पत्यांनी किती महिला रूग्णांचा गर्भपात केला याचीही तपासणी सुरू झाली आहे. दोन वर्षांपूर्वी या डॉ जाधव कुटूंबाचे सोनोग्राफी मशीन सील केले होते. हे प्रकरण न्यायालयात सुरू असताना बोगस कागदपत्रे सादर करून या जाधवर दांपत्याने नवे हॉस्पिटल सुरू करून गर्भपात करण्याचा धंदा सुरू केला होता.सांगोला पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.