बेकायदा इमारतीवर कारवाई करताना लगतच्या इमारतीवर मलबा कोसळला

(स्वदेश मालवीय)

भिवंडी – बेकायदा इमारतीवर कारवाई करताना लगतच्या इमारतीवर मलबा कोसळल्याची घटना भिवंडीत घडली.. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी नाही. मात्र या इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून या इमारतीमधील रहीवाशांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.
भिवंडी निजामपूर शहर महापालिकेने उच्च न्यायालयाचे आदेशाने शहारतील बेकायदा इमारतीवर हातोडा चालवून जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. अशीच गैबीनगर परिसरात ७ मजल्यांची रिजवी नावाने टोलेजंग इमारत उभारण्यात आली होती. या बेकायदा इमारतीवर कारवाई बाबत परिसरातील काही समाजसेवकांनी महापालिकेकडे तक्रार केल्या होत्या. मात्र बेकायदा बांधकामधारकास नोटीसी बजावण्यापलीकडे पालिका अधिकाऱ्यांनी पुढील कारवाई केली नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर न्यायालयाने दोन महिन्यापूर्वी सुनावणी होवून हि बेकायदा इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार कारवाईसाठी महापालिकेचा फौजफाटा जेसीबीसह तोडक कारवाई करीत असताना या इमारती लगत असलेल्या अमन नावाच्या ४ मजल्याच्या इमारतीवर काही भाग कोसळला.
दरम्यान बेकायदा इमारत तोडताना घेतली जाणार खबरदारी महापालिका प्रशासनाने घेतली नसल्याचा आरोपी परिसरातील नागरिकांनी केला आहे, याच इमारती लगत अमन इमारती मध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे मोहंमद रजा यांच्या रूमची भिंत तुडून या बेकायदा इमारतीचा मलबा घरात आला. यामुळे त्यांच्या घरातील साहित्यांचे नुकसानही झाले आहे. मात्र अद्यापही हि ७ मजली इमारत अर्धवट तोडलेल्या अवस्थेत असल्याने ती शेजारच्या इमारतीवर केव्हाही कोसळू शकते, या भीतीने नागरिकांनी आपले राहते घर सोडण्यास मजबूर झाले असून या रहीवाशांना रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email