बॅटरीशी खेळताना तिचा स्फोट होऊन एक दहा वर्षीय बालक गंभीर जखमी

जालना – मोबाईलच्या बॅटरीशी खेळताना तिचा स्फोट होऊन एक दहा वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची घटना जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव येथे घडली असून त्याच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार खेळत असताना खेळण्यात असलेली मोबाईलची बॅटरी फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला यावेळी बॅटरीचा स्फोट झाला.यात त्याची बोटे तुटली तसेच त्याच्या चेह-यावरही जखमा झाल्या.दरम्यान त्याच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.