बूट आणि चपला तयार करण्याचे उत्तर प्रदेशातील नामांकित संस्थेकडून प्रशिक्षण युवकांनी अर्ज करावा
( श्रीराम कांदु )
ठाणे:दि. ३: संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चांभार,ढोर,मोची,होलार या वर्गातील होतकरू तरुणांसाठी फुरसतगंज, उत्तर प्रदेश येथे दोन महिन्याचे (डिसेंबर ते जानेवारी)या कालावधीत चर्मोद्योग प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे.
यामध्ये Certificate Program in Cutting Operator-footwear आणि Certificate Program in closing operator –Footwear हे प्रशिक्षण दिले जाईल. लाभार्थीचे शिक्षण ८ वी पास आणि वय१८ते ३५ वर्षे दरम्यान असावे. त्याच्याकडे जातीचा दाखला,जन्मतारखेचा दाखला, रेशन कार्ड ,फोटो, आधार कार्ड असावीत. कार्यालयामार्फत लाभार्थ्यांना अर्ज वाटप आणि दाखल करण्याची तारीख १३ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर पर्यंत असून, अर्जाची छाननी करण्याची मुदत १६ आणि १७ नोव्हेंबर पर्यंत आहे.
लाभार्थीची मुलाखत व निवड २० नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर यादरम्यान होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या कार्यालयात जिल्हा व्यवस्थापक मो.क्र.-९९८७३२८२०४, सी.डी.जोशी विभागीय अधिकारी कोकण दूरध्वनी क्रमांक ०२२-२६४७६७०८ येथे संपर्क करण्याचे आवाहन डी.डी.दुधडे जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.