बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका; वेळ पडली तर रुळ उखडून फेका-असे राज ठाकरेंचं आवाहन

बुलेट ट्रेनसाठी जमिनी देऊ नका, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वसई आणि पालघरमधील नागरिकांना केले. तसचे, जर बळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडले जातील असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अशा शब्दात मोदी सरकारला खुलं आव्हान दिलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्राच्या दौऱ्याला वसई इथून सुरुवात केली. वसई इथं झालेल्या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.

राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेन आणि मुंबई-अहमदाबाद एक्स्प्रेस वेच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “बुलेट ट्रेन म्हणजे मुंबई गुजरातला देण्यासाठीचे कारस्थान आहे. बुलेट ट्रेनच्या नावाखाली महाराष्ट्रातल्या जमिनी बळकावायच्या आणि १९६० साली जी मुंबई महाराष्ट्राला दीर्घ लढाईने मिळवली तिचा ताबा घ्यायचा हा यांचा डाव आहे.नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत तर गुजरातचे पंतप्रधान आहेत. प्रत्येक गोष्टीत त्यांना अजून देखील गुजरात आठवतो. जर पंतप्रधान होऊन देखील मोदी गुजरातला विसरू शकत नाही तर मग महाराष्ट्रावर प्रेम करणारा राज ठाकरे संकुचित कसा?” असा सवालही राज ठाकरेंनी केला.

तुम्हाला सगळ्यांना गृहीत धरायला लागलेत. तुमच्या मुलांच्या करता उत्तम शिक्षण नाही, आरोग्य व्यवस्था नाही, तुम्हाला नोकऱ्या मिळोत न मिळोत याचं या सत्ताधाऱ्यांना किंवा मागच्या सत्ताधाऱ्यांना काहीच घेणं देणं नाही.भारतीय जनता पक्ष हे हिंदुत्वाच्या गप्पा मारतं, पण आझाद मैदानाच्या मोर्च्याच्या वेळेला जेंव्हा मुसलमानांनी पोलीस भगिनींवर हात टाकला, तेंव्हा त्याचा निषेध करणारा मोर्चा फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढला होता, या अश्या मुसलमानांवर जी दहशत बसली ती आमच्यामुळे बसली.

आरक्षण मुळात लागतं कशाला? फक्त शिक्षणात आणि सरकारी नोकरीत. खासगी क्षेत्रात आरक्षण नाही. सरकारी नोकऱ्या फक्त 5 टक्के आहे. या पाच टक्क्यांसाठी आपण भांडतोय असंही राज ठाकरे म्हणाले.हे राज्य एकदा राज ठाकरेच्या हातात देऊ बघा.

 

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email