* * @hooked colormag_head - 10 */ do_action( 'colormag_action_head' ); ?> बुलढाण्यातील सेंट्रल बँकेतील प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल – मुंबई आसपास मराठी
Uncategorized

बुलढाण्यातील सेंट्रल बँकेतील प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून गंभीर दखल

अटकेसाठी पथक रवाना

(म.विजय)

बुलढाणा, दि.२३ –  बुलढाणा जिल्ह्यातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाने पीककर्जासाठी एका महिलेशी केलेल्या अश्लाघ्य वर्तनाची अतिशय गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली असून, स्वत: जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे या प्रकरणावर लक्ष ठेऊन आहेत.

ही घटना कानावर पडताच, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी पोलिस अधीक्षकांशी संपर्क करून तत्काळ आरोपींच्या अटकेसाठी कारवाई करण्यास सांगितले. या प्रकरणात एका आरोपीला अटक झाली असून, बँक व्यवस्थापक फरार असल्याने त्याच्या अटकेसाठी पथक रवाना करण्यात आले आहे. या बँक व्यवस्थापकाविरूद्धचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून तयार केला जात असून, त्याच्या निलंबनासाठी सुद्धा बँक व्यवस्थापनाकडे प्रस्ताव पाठविला जात आहे. असे प्रकार जिल्हा प्रशासन अजीबात खपवून घेणार नाही आणि त्याच्याविरूद्ध कठोरातील कठोर कारवाई होईल, हे सुनिश्चित केले जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *